प्रसिद्ध महिला किर्तनकार राधाताई सानप यांनी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट


सोगाव – अब्दुल सोगावकर : महाराष्ट्रात नावाजलेल्या व विविध टिव्ही चॅनेल्सवर व विविध कार्यक्रमामध्ये जनतेचे समाजप्रबोधन करत किर्तन करणाऱ्या प्रसिद्ध किर्तनकार हभप राधाताई सानप महाराज – आईसाहेब संस्थांनच्या महंत, ता. पाटोदा, जि. बीड यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पर्यटकांची प्रथम पसंती असलेल्या किहीम येथे गुरुवार दि. १२ जून २०२५ रोजी पर्यटनासाठी येऊन पर्यटनाचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या चोंढी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी सरपंच पिंट्या गायकवाड यांनी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृतीचे महान कार्य करीत जनतेला अध्यात्मिक मार्गाने जीवन जगण्यासाठी आपल्या अनमोल वाणीने उपकृत करत कोट्यावधी जनतेची मने जिंकणाऱ्या किर्तनकार राधाताई सानप महाराज यांचे आपल्या कुटुंबासह स्वागत करत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार केला. यासमयी किर्तनकार राधाताई सानप महाराज यांनी सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या बाबतीत बोलताना त्यांनी पिंट्या गायकवाड यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, अध्यात्मिक आदी क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला, त्यांनी गोरगरिबांची सर्वोतोपरी केलेल्या सेवेमुळे आज ते सरपंच पदावर निवडून आले आहेत, आज आम्ही याठिकाणी पर्यटनासाठी आलो असता त्यांनी आमची सर्व व्यवस्था व मनोभावे सेवा केली, त्यांना अशाच प्रकारे गोरगरिबांना सेवा करण्यासाठी बळ मिळो, असे सांगत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत भरभरून आशीर्वाद दिले. यावेळी राधाताई महाराज यांच्या सोबत ऍड. भाग्यश्रीताई ढाकणे – महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष, ऍड. सुधीर वारे – माजी सरपंच खोपटी, ता. शिरूर, जि. बीड, बाबुराव वणवे – अलिबाग पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व गोपाळ सोळस्कर – युवा नेते भाजप, ता. बीड तसेच सरपंच गायकवाड यांचे वडील तथा ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड, आई सुप्रिया सुधीर गायकवाड, सासवणे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या हर्षला पाटील, चोंढी-बामणसुरे पोलीस पाटील प्रीती गायकवाड, आई फाउंडेशन चे राजू साळुंखे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.