अलिबाग (प्रतिनिधी) अलिबाग नगरपरिषद शाळा क्र. १ व २ मध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष श्री. प्रशांत मधुसूदन नाईक प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या सोबत माजी उपनगराध्यक्ष ॲड. मानसीताई म्हात्रे, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.
