आमदार महेंद्रशेठ दळवी आणि माझी दोस्ती कोणी तोडू शकत नाही – राजाभाई केणी यांचा इशारा


पेण (प्रशांत पोतदार) माझ्या आमदारकीच्या निवडणुकीत राजाभाईने खांद्याला खांदा लावून काम केले आहे आणि कार्यकर्त्याने ही नेत्याप्रमाणे मोठे झाले पाहिजे असे माझे मत आहे, राजाभाई केणी यांचा आज ५० वा वाढदिवस आहे, त्याच्या पाठी मी खंबीरपने उभा आहे यावेळी काही झाले तरी राजाभाईला राजिप सदस्य बनवणार असल्याचा ठाम निर्धार केला असल्याचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी वाढदिवस कार्यक्रमा वेळी बोलून दाखवला

तर यावेळी जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांसमोर बोलताना सांगितले की राजकारण काही असो कोणी काही बोलो पण माझी आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांची घट्ट दोस्ती आहे ती कोणी तोडू शकत नाही एकवेळ घरी बसेन पण आमदार महेंद्रशेठ दळवी यांची साथ कधी सोडणार नाही असा इशारा त्यांनी बोलणाऱ्यांना दिला आहे.

जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त हेमनगर,कुसुंबळे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सायंकाळी राजाभाई केणी यांना आमदार महेंद्रशेठ दळवी, जगदीश गायकवाड,महेश मोहिते,दिपक रानवडे,महेंद्र वावेकर, हर्षल पाटील,अनंत गोंधळी जीवन पाटील,स्वप्निल म्हात्रे,संकेत पाटील आदी मान्यवर,पदाधिकारी ग्रामस्थ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.