समाजकारण, शिक्षण आणि सेवाभावी कार्य याची त्रिसूत्री आत्मसात करत अॅड. मनस्वी महेश मोहिते यांनी “समर्थ फाऊंडेशन”च्या माध्यमातून अल्पावधीतच समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वकिलीच्या जोडीने सामाजिक कार्याला वाहून घेतले. त्यांच्या कार्यातून समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकांपर्यंत न्याय पोहोचवण्याचे सातत्याने प्रयत्न होत आहेत.
समर्थ फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, महिला सबलीकरण उपक्रम, ग्रामीण भागात रोजगार प्रशिक्षण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. कोविड काळात त्यांनी अनेक कुटुंबांना अन्नधान्य व औषधांची मदत पोहोचवली, ज्यामुळे त्यांचे कार्य सर्वत्र चर्चेत आले.
मनस्वी मोहिते यांचा संयमी, दूरदृष्टीपूर्ण आणि परिणामकारक नेतृत्वशैलीमुळे फाउंडेशनच्या कार्यात एकप्रकारचा व्यावसायिक व सामाजिक समतोल दिसतो. ग्रामीण युवकांमध्ये नेतृत्व क्षमता विकसित व्हावी, यासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले आहे. त्यांच्या कार्यातून तरुण पिढीला प्रेरणा मिळत असून ‘तरुण पिढीने राजकारणात नव्हे तर समाजकारणात उतरावे’ असा त्यांचा दृढ विश्वास आहे.
अॅड. मनस्वी महेश मोहिते हे आज फक्त कायदेपंडित नाहीत, तर एक संवेदनशील आणि प्रभावी सामाजिक नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी समाजातील अनेकांनी आशा आणि अपेक्षा ठेवलेल्या आहेत. त्यांच्या कार्यातून समर्थ फाऊंडेशन समाज परिवर्तनाचा एक मजबूत पाया ठरत आहे.