अरबी समुद्रात आढळली संशयित बोट


बोट पाकिस्तानी असल्याचा प्राथमिक अंदाज

रायगड (प्रतिनिधी): भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले आहे. त्यामुळे युद्धाचे ढग आता कायमच तयार होत आहेत. अशातच आता देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरात एक संशयीत बोट सापडली आहे. रेवदंडा नजीकच्या कोर्लई समुद्रात ही बोट आढळली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही बोट पाकिस्तानची असल्याचा प्राथमिक अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला आहे. रडारच्या टप्प्यात आल्याने ही बोट संशयित असून त्या बोटीवरील मार्क ती बोट पाकिस्तानी असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी बॉम्ब डिस्पोजल पथक, क्यू आरटी फोर्स स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक कोस्ट गार्ड नौदल, सीमा शुल्क, यास अन्य फौज पोलीस फौज फाटा दाखल झाला आहे.

खोल समुद्रात ही बोट आढळली असून वातावरणामुळे या बोटीपर्यंत पोहचणे शक्य झालेले नाही . यामुळे आता नौसेना आणि तटरक्षक दलाच्या बोटीमधून त्या संशयित बोटी पर्यंत पोहचण्याचा सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न असणार आहे . दरम्यान रायगड जिल्ह्यासह किनारपट्टी वरील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आढळल्या संशयित बोटीपर्यंत पोहचण्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या बार्जने संशयित बोटीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले