रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्हा गुन्हे शाखा (LCB) चे नवे पोलिस निरीक्षक म्हणून मिलिंद खोपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे तपासातील त्यांचा अनुभव आणि कार्यक्षमतेच्या आधारावर त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
PI खोपडे यांनी यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणून पोलिस दलात आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांमध्येही या निर्णयामुळे समाधानाचे वातावरण आहे.









