अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून, सावित्री, आंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुके पाण्याखाली गेले आहेत, वाहतूक ठप्प झाली आहे, घरात पाणी घुसले आहे आणि निसर्गाने थेट जनजीवनाला वेठीस धरले आहे.
घाटमाथ्यावरून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे साऱ्या नद्या रौद्र रूपात वाहू लागल्या असून जिल्ह्यातील प्रमुख रस्ते, पुलं, शहरं आणि गावं पाण्याच्या कवेत आली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी, परिस्थिती बेकाबू होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
अगदी ताजे आणि धक्कादायक अपडेट्स:
तळा तालुका –
▪️ अलिबाग–तळा रस्ता पाण्याखाली, वाहतूक बंद.
▪️ रोहा–तळा रस्ता ठप्प. पुलावरून नदी थेट वाहतेय!
महाड तालुका –
▪️ सावित्री नदी रौद्र रूपात, रस्ते नद्या बनलेत.
▪️ रायगड रोड संपर्क पूर्णपणे तुटला!
▪️ मल्लिकार्जुन मंदिराजवळचा पूल जलमय – धोक्याच्या उंबरठ्यावर.
रोहा तालुका –
▪️ विसंभीव, मेधा, महागाव, कुंबेठी – सगळीकडे पाणीच पाणी!
▪️ नाटीवळ रेल्वे ब्रिज पाण्याखाली.
▪️ काही भागात घरात पाणी – नागरिकांचे स्थलांतर सुरू!
पोलादपूर –
▪️ डोंगर उतारांवरून माती, दगड कोसळले – रस्ते ठप्प.
▪️ भारत सेवा मार्ग व माणगाव–मढवली मार्ग बंद.
▪️ भूस्खलनाचा धोका!
अलिबाग शहर –
▪️ रामराज पुलावरून पाणी – वाहतूक बंद.
▪️ बाजारपेठेत पाणी घुसले – व्यापारी अडचणीत.
म्हसळा तालुका –
▪️ जेटेघर भागात पूरपरिस्थिती – मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे.
प्रशासनाचा अलर्ट – पण उपाय कुठे?
जिल्हा प्रशासनाकडून “प्रवासी नागरिकांनी खबरदारी घ्या” असा इशारा देण्यात आला आहे. मात्र यंत्रणा कोठे आणि किती सक्रिय आहेत यावर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
रायगड पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. संकटाची लाट आता नद्या ओलांडून गावांमध्ये घुसली आहे. तात्काळ मदतकार्य सुरू न झाल्यास गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
……









