महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अलिबाग तालुका अध्यक्षपदी सुभाष म्हात्रे तर उपाध्यक्षपदी सुयोग आंग्रे


अलिबाग (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अलिबाग तालुका कार्यकारिणीची सभा अलिबाग येथे संपन्न झाली. या वेळी तालुका अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक प्रहार चे जिल्हा प्रतिनिधी सुभाष म्हात्रे यांची अध्यक्षपदी तरव उपाध्यक्ष पदी सुयोग आंग्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी कार्यकारणी अध्यक्ष सुभाष म्हात्रे,उपाध्यक्ष सुयोग आंग्रे , सचिव प्रमिला जोशी, खजीनदार धनंजय कवठेकर, सल्लागार आविष्कार देसाई,प्रसिद्धी प्रमुख महेंद्र म्हात्रे, सदस्य निलेश फुंडे, विजय चवरकर, अब्दुल सोगावकर, सुनील बुरुमकर.यांची निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष म्हात्रे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की,तालुका संघाच्या नियोजनाची अंमलबजावणी करणे, पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले व संघाच्या कार्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले.