रेवदंडा (महेेंद्र खैरे): रेवदंडयात समुद्र किनारी वाळू उत्खन्न करून वाळू तस्करी करणार्या मालवाहतुक ट्रक रंगेहाथ पकडून वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अखेर महसुलखाते व पोलिस या प्रशासनाला जाग आली अशी सर्वत्र चर्चा घडून आली. मात्र राजरोसपणे सुरू असलेल्या वाळू उत्खन्नन व वाळू तस्करीला सुत्रधारासह वाळू रॅकेटला महसुल खाते व पोलिस हा शासकीय अभय असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करत आहेत.
गेले अनेक वर्षे अलिबाग व मुरूड तालुक्यातील किनारपट्टीत वाळू उत्खन्नन करून वाळू तस्करी केली जात आहे. याबाबत बोंभाटा प्रसिध्दी माध्यमाने अनेकदा केला आहे. वाळू उत्खन्ननाने समुद्र किनारांची होत असलेली धुपने मोठया प्रमाणात नुकसानीस सामोरे जावे लागते, शिवाय वाळू तस्करी रॅकेटची वाढती गुंडगिरी,दहशत यांनी हैराण झालेल्या स्थानिकांनी वाळू तस्करीच्या विरोधात रौद्रयरूप धारण केले. याबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ प्रशासनाकडे येथील स्थानिकांनी केल्या आहेत. मात्र महसुल खाते व पोलिस या प्रशासकीय अभयाने राजरोसपणे वाळु तस्करी मोठया प्रमाणात होत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
रेवदंडा पोलिस हद्दीतील मौजे साळाव चेकपोस्ट येथे रेवदंडा-साळाव रस्तावर दि. 20 जुलै 2025 रोजी पहाटे 3.15 चे सुमारास कनार्टक राज्य, जिल्हा बेळगाव हुक्केरी तालुक्यातील कणगल येथील मनोजकुमार तानाजी पाटील वय 29 वर्षे हा माल वाहतुक ट्रक एम.एच. 09/ई एम-6930 ने बेकायदेशीर रित्या समुद्राची वाळू उत्खन्नन करून वाळू चोरून वाहतुक करत असताना रंगेहाथ सापडला. याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे तलाठी सजा बोर्ली मांडळाचे हेमंत सुधाकर चांदोलकर यांनी रेवदंडा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रेवदंडा पोलिसांनी 15 लाख रूपये किमंतीचा एक लाल रंगाचा अशोक लेलॅड कंपनीचा 3118 मॉडेलचा माल वाहतुक ट्रक एम.एच. 09/ई एम-6930, यामध्ये अंदाजे प्रति 4457 रूपये ब्रॉस अशी सहा ब्रॉस समुद्राची वाळू अंदाजे किमंत 26742 रूपये असे एकूण 15 लाख 26 हजार 742 रूपये किमंतीचा ऐवज ताब्यात घेतला आहे.
रेवदंडा पोलिस ठाणे येथे गुन्हा 83/2025 नुसार गुन्हा रजि.करण्यात आला असून फिर्यादीनुसार भा.न्या.स.कलम 303 (2) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 15 सह खान खनिज अधि कलम 21 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक मंगेश सिताराम बाचकर हे पोलिस ठाणे इन्चार्ज सहा.पोलिस निरिक्षक श्रीकांत किरविले यांचे मार्गदर्शनाखाली करत आहेत.
Home ताज्या बातम्या रेवदंडयात वाळू तस्करीत मालवाहतुक ट्रक चालकांवर गुन्हा दाखल सुत्रधारासह वाळू तस्करी रॅकेटला...