चोंढी येथील किहीम ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या प्रतिभा सुरेश वेलणकर यांचे अल्पशा आजाराने निधन


सोगाव (अब्दुल सोगावकर) : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील किहीम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कै. सुरेश वेलणकर यांच्या पत्नी तथा किहीम ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या प्रतिभा सुरेश वेलणकर(वय ६१) यांचे शनिवार दि. १९ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी अल्पशा आजाराने नवीमुंबईतील वाशी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शांत, हसतमुख व मितभाषी स्वभावाच्या असणाऱ्या प्रतिभा वेलणकर यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी व इतर मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवार दि. २० जुलै रोजी सकाळी ८:३० वाजता चोंढी येथील स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी व अंत्यसंस्कारावेळी रघुजीराजे आंग्रे, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य काका ठाकूर, माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, सातिर्जे माजी सरपंच राजाभाऊ ठाकूर, आगरसुरे माजी सरपंच जगनआप्पा पेढवी, रवीनाना ठाकूर, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व इतर ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, शेतकरी कामगार पक्षाचे संदीप गायकवाड, महेश टॉकीजचे सत्यजित दळी, तांबोळी हॉस्पिटलचे डॉ. कोतेकर, नितीन राऊत, उद्योजक राजू शिंदे, जयेश शिंदे, ऍड. जयेश जोशी, चोंढी-बामणसुरे पोलीस पाटील प्रीती गायकवाड, श्री. जय हनुमान ट्रस्ट चोंढी व सुखदा महिला मंडळ चोंढीचे सर्व पदाधिकारी यासोबतच इतर राजकीय व सामाजिक क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, पंचक्रोशीतील सर्व स्तरातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दि. २८ जुलै रोजी व तेरावे विधी गुरुवार दि. ३१ जुलै रोजी राहत्या घरी होणार आहेत, तसेच मामां व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा अन्य कोणाकडूनही दुखवटा स्वीकारला जाणार नाही, असे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले आहे.