राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर घारे यांची निवड


रायगड (प्रतिनिधी): सुतारवाडी येथे आज रायगड जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पक्ष संघटन अधिक भक्कम करण्यावर, तसेच कार्यकर्त्यांमधील संवाद आणि समन्वय यावर सखोल चर्चा झाली.

या बैठकीत संघटनेच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. हनुमंत जगताप यांना प्रदेश सरचिटणीस तर सुधाकर घारे यांना रायगड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दोघांचा संघटनात्मक अनुभव पक्षासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. बैठकीत पक्षाच्या पुढील कार्यपद्धतीवर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः स्थानिक पातळीवर पक्षाची पकड अधिक बळकट करण्याच्या उपाययोजनांवर विचारविनिमय झाला.

या बैठकीस रायगड चे खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनात्मक बळकटीच्या दिशेने ही बैठक महत्त्वाची ठरली.