तुळजाई बोट दुर्घटना: तिन्ही बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले


रायगड (प्रतिनिधी) :  खांदेरीजवळील ‘तुळजाई’ बोट दुर्घटनेतील बेपत्ता असलेल्या तिन्ही मच्छीमारांचे मृतदेह सापडले आहेत. या मृतांमध्ये एकाचा मृतदेह सासवणे किनारी, दुसऱ्याचा किहीम येथे, तर तिसऱ्याचा दिघोडे किनाऱ्यावर आढळून आला आहे.

सदर घटनेतील सर्व बेपत्ता मच्छीमारांचा शोध पूर्ण झाला असून, पोलीस विभागाच्या वतीने पुढील कार्यवाही सुरू आहे.