कुस्ती स्पर्धेला वाडगाव प्रथम


अलिबाग (प्रतिनिधी): नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी कुस्ती स्पर्धा खंडाळे (अलिबाग) येथे पार पडली. महावीर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित या कुस्ती स्पर्धेला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत परिसरातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. त्यांनी दमदार चढाया करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. चुरशीच्या कुस्त्यांमुळे स्पर्धा अधिक रंगतदार ठरली.

या स्पर्धेत वाडगाव संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर आवास संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. कल्याण कोण संघाने तृतीय क्रमांकावर समाधान मानले.

महावीर ग्रामस्थ मंडळाच्या संयोजनामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. आयोजक मंडळाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.