किहीम येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार


अलिबाग (प्रतिनिधी): दिनांक 03 ऑगस्ट 2025  मौजे किहीम येथील पाणंद रस्त्यावर आज वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमास मंडळ अधिकारी श्री. श्रीनिवास मेतरी, ग्राम महसूल अधिकारी श्रीम. समीक्षा संदीप मोहिते/शिर्के, किहीमचे सरपंच श्री. प्रसाद गायकवाड, पोलिस पाटील श्रीम. संध्या काठे (किहीम), श्रीम. प्रिती गायकवाड (बामणसुरे), महसूल सेवक श्री. प्रभाकर तळप यांची उपस्थिती लाभली होती.

वृक्षारोपणाद्वारे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीतर्फे होत आहे. उपस्थित मान्यवरांनीही ग्रामस्थांना जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.