देहदानाबाबतचे गैरसमज दूर केले पाहिजेत: पुरुषोत्तम पवार


अलिबाग (प्रतिनिधी): देहदानामुळे आपण अनेकांना जीवदान देऊशकतो हे सर्वसामान्यांना माहीत नाही. देहदान तसेच अवयवदान याबाबत लोकांमध्ये गैरसमज आहेत. ते दूर केले पाहिजेत. लोकांची मानसिकता बदलली पाहिजे, असे मत फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे  संस्थापक अध्यक्ष  पुरुषोत्तम पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त रविवारी ( दि. ३) फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्यातर्फे राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलेझर्स (आरसीएफ) थळ यांच्या सहकार्याने कमळ डायलिसिस सेंटर अलिबाग येथे देहादनाबाबत कार्यशाळा आयोजित  करण्यात आली होती. या कार्यक्रमात देहदान व अवयवदान  याबाबत मार्गदर्शन  करताना पुरुषोत्तम पवार बोलत होते. फेडरेशनच्या कार्यकारी समिती सदस्या  डॉ.  शुभदा कुडतरकर यांनी नेत्रदानाबाबत  माहिती दिली.

दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे मुख्य समन्वयक कुमार कदम ,  कमळ सेवा संस्थेचे संचालक या कार्यशाळेचे निमंत्रक गिरीश तुळपुळे, आरसीएफ थळचे जनसंपर्क अधिकारी डॉ. राकेश कवळे, माजी जिल्हा सरकारी वकील एड. प्रसाद पाटील, माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ. राजाराम हुललवान, रोटरी क्लबचे अध्यक्ष अंकुश पाटील , रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दिलीप भाड, दिलीप जोग, संजीवनी नाईक, डॉ. नितीन गांधी,  अनिल आगाशे, केतन शहा, श्रीनिवास पाटील,  प्रवीण जैन , संदीप मोने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महादानाची गाथा या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. राकेश कवळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. कुमार कदम यांनी प्रास्ताविक केले. गिरीश तुळपुळे यांनी आभारप्रदर्शन केले.