नागाव सरपंच हर्षदा मयेकर यांनी पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांची घेतली भेट; नागावच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा


अलिबाग (प्रतिनिधी): नागाव गावाची ओळख पर्यटनस्थळ म्हणून वाढत असताना, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी नागाव सरपंच सौ. हर्षदा मयेकर यांनी रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांची सदिच्छा भेट घेऊन विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान नागाव पोलिस चौकीच्या सध्या सुरू असलेल्या कामाची माहिती देण्यात आली. किनारपट्टी भागात अलीकडे वाढत असलेल्या बेकायदेशीर हालचालींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यावर उपाय म्हणून संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर २४x७ पोलिस देखरेख ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे बसवण्याची सूचना सरपंच मयेकर यांनी केली.

या बैठकीदरम्यान महिलांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रशासनामध्ये सकारात्मक बदल शक्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण पोलीस अधीक्षक दलाल यांनी नोंदवले.

पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येणाऱ्या नागावसारख्या गावासाठी सुरक्षाव्यवस्था सक्षम करणे ही काळाची गरज असून, स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.