फुफादेवी पाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ


अलिबाग (प्रतिनिधी): फुफादेवी पाडा (ग्रा.पं. सारळ) येथील मुख्य रस्त्यापासून खाडीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आला. या कामासाठी रायगडचे लोकप्रिय खासदार मा. सुनीलजी तटकरे यांचे विशेष सहकार्य लाभले असून, अलिबाग-मुरुड-चणेरा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मा. अमितदादा नाईक, ग्रामपंचायत सारळच्या माजी सरपंच सौ. अमृता अमित नाईक आणि माजी उपसरपंच मा. संजय दामोदर पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हे काम सुरू झाले आहे.

या काँक्रिटीकरणामुळे पावसाळ्यात होणाऱ्या चिखल आणि जलजमावाच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळेल, तसेच नागरिकांचे दळणवळण अधिक सुलभ व सुरक्षित होईल. स्थानिक ग्रामस्थांनी या विकासकामाचे स्वागत करत सर्व लोकप्रतिनिधींना मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या शुभारंभ सोहळ्याला परिसरातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

हा रस्ता विकास ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून होत असल्याने भविष्यातही अशाच पद्धतीने विविध मूलभूत सुविधा गावात उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.