आदर्श तर्फे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , रायगड – अलिबाग व जिल्हा पोलिस कल्याण निधिला प्रत्येकी एक लाख रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले. नाना शंकर शेठ यांच्या पुण्यतिथि निमित्ताने संस्थेमध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे परितोषिक वितरण करण्यात आले. या निबंध स्पर्धेत रेवस शाखाधिकारी कौस्तुभ म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. चेंढरे शाखाधिकारी सौ. रेश्मा पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. कुरुळ शाखाधिकारी सौ. प्रियांका जगताप – वाळंज व चोंढी शाखा सहशाखाधिकारी श्री. श्रीराज पावशे – यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. या निबंध स्पर्धेचे परीक्षण सू.ए.सो. हायस्कूल , कुरुळ च्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता पाटील यांनी केले . संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री. सुभाष विठ्ठल पानसकर सर यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी २३ गड व किल्ले यांची ट्रेकिंग केल्या त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सभे पूर्वी याच ठिकाणी सभासद प्रशिक्षण आयोजित केले होते . सहकारी संघ पुणे चे श्री .एस.बी. वटाणे सर यांनी सभासद यांची कर्तव्य , जबाबदारी याविषयी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे संस्थापक श्री सुरेश पाटील यांनी संस्थेतर्फे बँकिंग व सहकाराचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा मनोदय आपल्या मनोगतात व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष श्री अभिजीत पाटील सर यांनी संस्थेची आर्थिक स्थिति सभासदांसमोर सादर केली.या सभेला श्री. सुरेश पाटील , अभिजीत पाटील , कैलास जगे , अनंत म्हात्रे , सतीश प्रधान , ॲड. आत्माराम काटकर , विलाप सरतांडेल , ॲड.रेश्मा पाटील , ॲड. वर्षा शेठ , भगवान वेटकोळी , रामभाऊ गोरीवले , महेश चव्हाण , श्रीकांत ओसवाल , संजय राऊत सी. ए ., डॉ.मकरंद आठवले हे संचालक उपस्थित होते. आभार प्रदर्शन संस्थेचे तज्ज्ञ संचालक डॉ. मकरंद आठवले यांनी केले . सभेचे सूत्र संचालन संस्थेचे मुख्याधिकारी श्री उमेश पाटील यांनी केले .