मुंबई (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील बहिरेश्वर मत्स्य व्यवसाय विकास मच्छिमार सहकारी संस्था (घेरंड) मर्यादित मच्छिमार संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री मा. नितेश राणे यांनी भूषवले.
या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, तसेच मच्छिमार संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेच्या सदस्यांनी मत्स्य व्यवसायात येणाऱ्या अडचणी, पायाभूत सुविधांचा अभाव, तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसंबंधी सविस्तर चर्चा केली.
या वेळी मंत्री राणे यांनी संबंधित मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली असून, लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.