अलिबाग (प्रतिनिधी): महसूल सप्ताहानिमित्त तहसील कार्यालय, अलिबाग येथे आज सांगता समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाला अलिबाग उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. मुकेश चव्हाण, तहसीलदार श्री. विक्रम पाटील, नायब तहसीलदार श्री. अजित टोळकर, श्री. प्रताप राठोड, श्रीम. मानसी पाटील व श्री. संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास अलिबाग तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते. महसूल सप्ताह तसेच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक व सहाय्यक महसूल अधिकारी यांचा उपविभागीय अधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी श्री. चव्हाण यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत उत्तम सेवा देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.