अलिबाग (प्रतिनिधी): ठाणे येथील कलानंद नृत्य संस्था आयोजित ‘कलांजली उत्सव २०२५’ मध्ये होली चाईल्ड वेश्वी सीबीएसई इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी सान्वी कार्वेकर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विजेती ठरली.
ठाणे – कलानंद नृत्य संस्थेच्या वतीने ‘कलांजली उत्सव २०२५’ या कलांजली राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन दादा कोंडके अॅम्फीथिएटर, ठाणे येथे करण्यात आले. या स्पर्धेत कथक आणि भरतनाट्यम या प्रकारांत देशभरातील अनेक नृत्यांगनांनी सहभाग घेतला होता.
या प्रतिष्ठित स्पर्धेत होली चाईल्ड सीबीएसई शाळेच्या सान्वी कार्वेकर हिने कनिष्ठ गटातील ‘ज्युनियर ड्युएट’ प्रकारात सहभाग घेवून कथक नृत्य सादर करून राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. देशभरातील दिग्गज नृत्यांगनांमध्ये स्पर्धेत भाग घेवून हा मान मिळवल्याने सान्वीचे शाळा, पालक आणि गुरूंकडून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल सान्वी कार्वेकरचे पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांचे प्रोत्साहन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.