सोगाव – अब्दुल सोगावकर :अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांना किहीम व बामणसुरे आदिवासीवाडी येथील आदिवासी भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला.
आपल्या भागातील सर्व आदिवासी बांधवांप्रती आपुलकी असलेले सरपंच गायकवाड यांना महिला भगिनींनी व मुलींनी मोठ्या प्रमाणात राखी बांधून आपले प्रेम व्यक्त केले, याप्रसंगी सरपंच गायकवाड यांच्या निवासस्थानी आदिवासी महिला भगिनीं व मुलींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पिंट्या गायकवाड यांनी ‘मी सदैव तुमच्या पाठी भावाप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या अडचणीत उभा आहे’ असे सांगून आश्वस्त करत सर्व बहिणींना ओवाळणी दिली.









