किहीम ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच प्रसाद गायकवाड यांच्या ध्वजारोहण


सोगाव – अब्दुल सोगावकर :अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत कार्यालय येथे भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठ वाजता किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी स.म.वडके शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते सादर केली, यानंतर उपस्थित सर्वाना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला किहीम सरपंच प्रसाद गायकवाड यांच्यासह उपसरपंच मिलिंद पडवळ, इतर ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच पंचक्रोशीतील आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.