रायगड (खास प्रतिनिधी): रायगड जिल्हा जणू मुसळधार पावसाच्या रडारवर आला आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मुख्य नद्या आणि उपनद्यांसह ओढ्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसाचा तडाखा मुरुड तालुक्यातील मिठेखार गावाला बसला आहे. गावात असणाऱ्या एका घरावर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये त्या घरात राहणारी एक 75 वर्षांच्या अजीबाईंचा मृत्यू झाल्याची माहिती मुरूडचे निवासी नायब तहसीलदार संजय तवर यांनी दिली.
दुर्घटना सकाळी घडली असून ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. मुरुड तहसीलदार त्यांच्या आपत्ती निवारण यंत्रणेसह मिठेखार गावात पोहचले आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या घरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.









