बिल मंजुरीसाठी घेतली 25 हजारांची लाच कनिष्ठ सहाय्यक, शिपाई, ठेकेदाराला अटक 


रायगड (प्रतिनिधी): जलजीवन मिशन योजनेतील कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी 35 हजारांची मागणी करून तडजोडीअंती 25हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.लाच स्वीकारणाऱ्यांमध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील कनिष्ठ लिपिक आशिष कांबळे, शिपाई दिलीप कावजी आणि खासगी कंत्राटदार विलास ढेवे यांचा समावेश आहे. या तिघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली असून त्यांच्या विरोधात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 एम.एस.एस कंस्ट्रक्शन वडखळ याना केंद्र शासनाची जल जीवन मिशन या योजने अंतर्गत सन २०२२ -२०२३ साली मोजे :शेणे ता.पेण,जि.रायगड या ठिकाणी नळ पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले होते. सदरचे काम करण्यास त्याना वेळ नसल्याने या कामा संदर्भात लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया व इतर कामकाज करण्याचे अधिकार पत्र तक्रारदार पुरुष ३१ वर्ष याना देण्यात आले होते.त्या अनुषंगाने संबंधित  पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण ज्या प्रमाणे पूर्ण होईल त्यानुसार एम.एस.एस कंस्ट्रक्शन याना मंजूर निधी पैकी देयक देण्यात आले आहे.सदरचे काम दिनांक १५/०७/२०२५ रोजी पूर्ण करण्यात आले होते.त्यानुसार उर्वरित ६९ लाख रुपयाचे बिल मंजूर करून घेण्या साठी तक्रारदार यांनी वारंवार जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग येथे पाठपुरावा केला होता .आज दिनाक २२/०८/२०२५ रोजी उर्वरीत ६९ लाख रुपयाचे बिल मंजुर करून घेण्यासाठी  लोकसेवक दिलीप रामचंद्र कावजी यांनी  ३५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २५ हजार रुपये लाचेची रक्कम सापळा कारवाई दरम्यान स्वीकारली व स्वीकारून लाचेची रक्कम कार्यालयातील त्यांचे सहकारी आशिष कांबळे , कनिष्ठ सहाय्यक लेखा व वित्त विभाग यांच्याकडे दिली असता त्यांनी ती लाचेची रक्कम खाजगी इसम विलास भिकाजी ढेबे यांच्याकडे सुपूर्त केली त्यामुळे सदर सापळा कारवाई मध्ये दोन लोकसेवक व एक खाजगी इसम यांना लाचेच्या रक्कमे सह ताब्यात घेण्यात आले आहे.
      रायगड जिल्हा परिषदेमधील या लाचेच्या प्रकरणात पर्यवेक्षण अधिकारी:पोलीस उपअधिक्षक सरिता भोसले
सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक निशांत धनवडे,  पो नि/ नारायण सरोदे, सहा फौज. विनोद जाधव, सहा फौज. अरुण करकरे, सहा फौज. सुषमा राऊळ, पो.हवा/महेश पाटील, पो हवा/ परम ठाकूर, पो हवा/सुमित पाटील, पो हवा./सचिन आटपाडकर,  पो शि/ घरत,म पो शि/मोनिका मोरे, म पो शि मोनाली पाटील, चालक सागर पाटीलयांचा समावेश होता.