उसरमधील शेतकरयांची पंचायत समितीवर धडक


अलिबाग रायगड:तालुक्‍यातील उसर येथील वैद्यकीय महाविद्यलयाच्‍या इमारतीचे बांधकाम करण्‍यात येत आहे. या कामामुळे नैसर्गिक नाले बंद होण्‍याबरोबरख्‍  स्‍थानिक शेतकरयांच्‍या शेतीचे नुकसान होण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्‍याने उसरमधील ग्रामस्‍थांनी आज अलिबाग पंचायत समितीवर धडक दिली. मेडीकल कॉलेजच्‍या बांधकामासाठी पत्र्याचे कंपाऊंड टाकण्‍यात आले आहे. यामुळे शेतकरयांचा पूर्वापार वहिवाटीचा रस्‍ता बंद झाला आहे. भरावामुळे नैसर्गिक पाणी वाहून नेणारे नालेदेखील बंद झाले आहेत. या परीसरात बांधकामासाठी उभारण्‍यात येणारया आरएमसी प्‍लांटलादेखील शेतकरयांचा विरोध आहे.