अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग-वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याचा फटका वाहतुकीसह प्रवाशांनाही बसत आहे. काल दुपारी शिवाई एस.टी. बस या खड्यात रुतल्याने प्रवासी अडचणीत सापडले. काही वेळ बस रस्त्यावर अडकून राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. अनेकांनी रस्त्यावर उतरून मदत करण्याचा प्रयत्न केला.

या वेळी पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन बस बाहेर काढण्यास मदत केली. प्रवाशांना दुसऱ्या वाहनाने त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचविण्याचीही व्यवस्था करण्यात आली.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण होत असून, संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.









