अलिबाग (प्रतिनिधी) : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) अलिबाग शाखेच्या वतीने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने कॅम्प (Compulsory Community Medicine Programme – CCMP) अंतर्गत ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेसाठी नियुक्त केलेल्या एमबीबीएस डॉक्टरांच्या नियोजनात तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नॅशनल मेडिकल कौन्सिल (NMC) व राज्य वैद्यकीय परिषदेच्या नियमानुसार एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य इंटर्नशिप करावी लागते. मात्र, ग्रामीण सेवेसाठी दोन वर्षांची नियुक्ती ही अव्यवहार्य ठरत असून त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांवर आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक ताण वाढत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था बळकट करण्याऐवजी अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील सकारात्मक पर्यायही आयएमएने मांडले आहेत. त्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देणे, ग्रामीण सेवेसाठी आकर्षक योजना राबवणे, टेलिमेडिसिन, मोबाईल मेडिकल युनिट्स व डिजिटल आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
“पूर्णपणे प्रशिक्षित आणि पात्र एमबीबीएस डॉक्टरांनाच आरोग्यसेवेत काम करण्याची संधी द्यावी. अन्यथा ग्रामीण रुग्णसेवेवर प्रतिकूल परिणाम होईल,” असेही आयएमए अलिबाग शाखेने स्पष्ट केले आहे.
**********
सीसीएमटी नावाचा कोर्स होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे. हा एक वर्षाचा कोर्स करून त्या डॉक्टरांना अलिओपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र मेडिकलकौन्सिल मध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. या दोन निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील अलिओपॅथी डॉक्टरांनी एक दिवस बंद आंदोलन केले आहे. या बंदच्या कालावधीत रुग्णांची गैरसोय होणार नाही याची पूर्णतः दक्षता घेण्यात आली आहे.
डॉ. विनायक पाटील









