पावसाळ्यात गढूळ पाणी पाजलेत, आत्ता तरी शुद्ध पाणी दया?


अलिबाग (प्रतिनिधी): उमटे धरणावर अवलंबून असणाऱ्या नागरीकांना पिण्यायोग्य व शुध्द पाणी पुरवठा करणेबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने अँड राकेश पाटील यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना लेखी अर्ज दिला, सदरच्या अर्जामध्ये अँड ,पाटील म्हणाले की,उमटे धरणावर ४४ गांवे व ३३ आदिवासी वाडया उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सन २०२४ मध्ये सामाजिक बांधिलकी जपत्त आम्ही सामाजिक संस्थांनी मिळून उमटे धरणाचा गाळ काढण्याचे काम केले होते. परंतु सदरच्या गाळ काढण्याचे काम सुरू केल्यापासून ते शेवटपर्यंत आपल्या विभागाचा एकही अधिकारी धरणावर फिरकला नाही. धरणाचे भिंतीला भगदाड पडून धरण फुटणार ? सदरने धरण फुटल्यास जिवीत हानीला कारणीभूत असणाऱ्या यंत्रणांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याच्या तक्रारी केल्यानंतर आम्हाला समजले की, उमटे धरणाचे खरे मालक आपणच आहात.

उमटे धरणाची मालकी आपल्याकडे असल्यामुळे सदरचे निवेदन आपल्याला देत असून उमटे धरणातून भर पावसाळयात दरवर्षीप्रमाणे ‘गढूळ पाणी’ पाजण्याचे काम आपण केले आहात. परंतु आता पावसाळा संपत्त आला असतानाही उमटे धरणातून आजही गढूळ मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. धरणाच्या लगत कोटी रूपये खर्च करून पाणी शुध्द करण्याचे फिल्टर प्लांन्ट बसविले असतानाही पाणी शुध्द मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे.
कार्यकारी अभियंता उमटे धरणाचे मुख्य मालक या नात्याने आपण उमटे धरणावर ४४ गांवे व ३३ आदिवासी वाडयांना शुध्द पिण्यायोग्य पाणी पुरवण्याची पुण्याचे काम आपण करावे.

*************

उमटे धरणाच्या पायथ्याशी कोटी रुपये खर्च करून जल शुद्धीकरणाचा प्लांट आहे, पण तो नावालाच आहे, पावसाळ्यात दरवर्षी प्रमाणे गढूळ पाणी येत होते परंतु यंदाही तीच परिस्थिही आहे, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे शुद्ध पाण्यासाठी गेल्यानंतर ते जबाबदारी झटकून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बोट दाखवतात,म्हणून आम्ही उमटे धरणाच्या मुख्य मालकांनाच शुद्ध पाणी मिळण्यासाठी अर्ज दिला आहे
अँड, राकेश पाटील
उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड,