खारिकवाडा येथे तालुका मर्यादित भव्य दिव्य भजन स्पर्धा उत्साहात संपन्न


अलिबाग (प्रतिनिधी) : श्री समर्थ स्वयं सहायता सेवाभावी संस्था, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ खारिकवाडा, ग्रामस्थ मंडळ खारिकवाडा आणि पंचक्रोशी भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका मर्यादित भव्य दिव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता खारिकवाडा हनुमान मंदिर येथे पार पडली.

या भजन स्पर्धेला तालुक्यातील विविध भजन मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात सादर झालेल्या भजनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. परीक्षकांनी उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे विजेत्यांची घोषणा केली.

निकाल पुढीलप्रमाणे –

प्रथम पारितोषिक : जय हनुमान प्रासादिक मंडळ, खारीकपाडा – अजय राऊत बुवा

द्वितीय पारितोषिक : विष्णू प्रासादिक मंडळ, खरदोडू कुळे – शिवकुमार पाटील बुवा

तृतीय पारितोषिक : जय हनुमान प्रासादिक मंडळ, मोरे – उद्देश कासारे बुवा

चतुर्थ पारितोषिक : श्री गणेश मंडळ, आदाड – विलास भुरे बुवा

याशिवाय विशेष पारितोषिके देण्यात आली –

पखवाज वादन : साईराज गुरव, गुरुदत्त प्रासादिक मंडळ, मुरुड

तबला वादन : संकल्प सागर राऊत, जय हनुमान प्रासादिक मंडळ, खारीकपाडा

उत्तम कोरस : सचिन बुवा व कोरस पथक, जय हनुमान प्रासादिक मंडळ, खारीकपाडा

चाखवा : अविनाश वाडकर, श्री गणेश मंडळ, आदाड

उत्तम गणवेश : जय हनुमान मंडळ, खरंबोली

या भजन स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांनी भक्तिभावाने सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले. आयोजक मंडळांनी सर्व विजेत्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरव केला.