अलिबाग-रोहा मार्गावर कारचा भीषण अपघात; जीवितहानी टळली


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग-रोहा मार्गावरील आरसीएफ कॉलनी गेटसमोर बुधवारी (दि. १) सकाळी एका कारचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात झाल्यानंतर काही काळ त्या परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. कार अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसले तरी या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.