सोगाव (अब्दुल सोगावकर) :गांव व परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाची भूमिका बजावत आहेत, या सीसीटीव्ही कॅमेरेमुळे अनेक ठिकाणी अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. यासाठी सर्व गावांनी मुशेत गावाचा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आदर्श घेऊन कॅमेरे बसवावे, असे आवाहन अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी
मुशेत येथे केले.
मुशेत येथील जाधव पाडा येथे मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या वतीने मुशेत गावाला सामाजिक बांधिलकी म्हणून देण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
किशोर साळे यांनी पुढे बोलताना सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे आपला गांव व परिसर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे ही सध्या काळाची गरज आहे. सर्व महिला व पुरुष ग्रामस्थांनी आपली मुले सोशल मीडियावर काय पाहतात व त्याचा वापर कशा पद्धतीने याची खात्री करावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारची आपत्ती येणार नाही. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारांना नागरिकांना फसविणे अधिक सोपे झाले आहे, तरी आपण सर्वांनी जागरूक असणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी काही उदाहरणासह स्पष्टीकरण करत सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे व सातिर्जे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाभाऊ ठाकूर यांनी मुशेत येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी योगदान देणारे मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्यासह रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, केशव चांदोरकर सर, सातीर्जे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाभाऊ ठाकूर, प्राची ठाकूर, मापगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच समद कुर, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, माजी सदस्य अनिल जाधव, संजय शिंदे, अण्णा सातमकर, राजेंद्र घरत, माजी सदस्या सानिका घाडी, प्राजक्ता जाधव, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, विवेक जोशी, सुरेश राऊत, सुधाकर ठकरुळ, सूचित थळे, अनिल अनमाने, किशोर नागावकर, सतिश घाडी, संतोष बांद्रे, प्रविण घाडी, मुनावर कुर, अजित हरवडे सर, सम्राट ठाकूर, रूपेश अनमाने, गीतेश ठकरुळ, निकेश अनमाने, अक्षय जाधव, परेश सुर्वे, प्रतिक अनमाने, संजय जाधव, शलाका थळे आदी मान्यवर व मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील तसेच मुशेत गावातील ग्रामस्थ महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांना ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित हरवडे सर यांनी केले.









