अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे वन विभागामार्फत आयोजित ‘माझे वन’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कु. तटकरे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत, प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केले. त्यांनी “झाड लावा, झाड जगवा” या संदेशासह हरित महाराष्ट्रासाठी सामूहिक सहभागाची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमास वन विभागाचे अधिकारी, स्थानिक जनप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विविध प्रजातींची झाडे लावून ‘माझे वन’ उपक्रमाला हातभार लावला.
या वृक्षारोपण उपक्रमातून वाडगाव परिसरात हरित वातावरण निर्मितीचा संकल्प करण्यात आला असून पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा असा संदेश देण्यात आला.









