खोपोलीचे युवा उद्योजक विक्रम साबळे यांना “युवा लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार – २०२५”


मुंबई (प्रतिनिधी): दिनांक मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित भव्य समारंभात, खोपोलीचे तेजस्वी युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते कु. विक्रम यशवंतशेठ साबळे यांना “युवा लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार – २०२५” या बहुमानाने गौरविण्यात आले.

हा सन्मान आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. डॉ. ओमप्रकाशजी शेट्ये आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सौ. अलका कुबल-आठल्ये यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र, बीड (भारत सरकार संलग्न) व क्रांती ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

खोपोलीच्या भूमीतून झळकणारे कु. विक्रम साबळे हे केवळ यशस्वी उद्योजक नव्हेत, तर सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि नवयुगाच्या प्रगत विचारांचे सजीव प्रतीक आहेत. विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी युवकांसमोर सेवाभावी कार्याचा आदर्श उभा केला आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी रायगड यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
त्यांचा हा सन्मान अनेक तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरो, अशी शुभेच्छा व्यक्त करण्यात आली.