अलिबाग एसटी स्थानकातील स्वच्छतेचा दिखावा; मेट्रो रायगडच्या बातमीने प्रशासनाला जाग


अलिबाग(प्रतिनिधी): अलिबाग एसटी स्थानकात गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतेचा गंभीर अभाव दिसून येत होता. स्थानक परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचले असून, दुर्गंधीमुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. या स्थितीची दखल मेट्रो रायगडने घेतली आणि बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली. बातमी झळकताच तातडीने कर्मचारी वर्गाला सफाई मोहिमेसाठी पाचारण करण्यात आले आणि परिसरातील कचरा तात्काळ साफ करण्यात आला. तथापि, ही कारवाई केवळ दिखावा ठरू नये, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नाकडे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.