अलिबाग एसटी स्टँडमध्ये अपघात अवैध पार्किंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर


अलिबाग(प्रतिनिधी): अखेर जे व्‍हायचं तेच झालं. अलिबाग बस्‍थानकात अपघात झालाच. बससथानकात शिरणारया लालपरीने स्‍थानकातील उभ्‍या असलेल्‍या दोन दुचाकी गाडयांना ठोकरले. यात दोनही गाडयांचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र या अपघातामुळे अलिबाग एसटी स्‍टँडमधील अवैध पार्कींगचा मुद्दा पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आज दुपारच्‍या सुमारास हा अपघात झाला. बससथानकातील कॅन्‍टीनच्‍या मागे दोन दुचाकी गाड्या उभ्‍या होत्‍या. या दुचाकींना एसटीने ठोकर दिली. या अपघातामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. अलिबाग एसटी स्‍टँडमधील पार्कींगची समस्‍या वर्षानुवर्षे तशीच आहे. इथं येणारे प्रवासी आपली दुचाकी कुठेही कशीही उभी करतात आणि निघून जातात. आपल्‍या चुकीमुळे इतरांना अडथळा होईल याचा जरासुदधा विचार केला जात नाही. दुसरीकडे एसटीने स्‍थानक परीसरातील काही जागा पे अॅन्‍ड पार्कसाठी भाडयाने दिली आहे. परंतु प्रवासी त्‍याचा खूपच कमी वापर करतात. काही नोकरदार वर्ग याचा लाभ घेतात. परंतु अलिबाग शहरात कामा‍निमित्‍त येणारे नागरीक बिनधास्‍त स्‍थानकात आपली गाडी उभी करून ठेवतात. पे अॅन्‍ड पार्कसाठी किरकोळ भाडे आकारले जाते परंतु ते वाचवण्‍याच्‍या नादात स्‍थानकातील वाहतूकीचे नियोजन पुरते बिघडलेले पहायला मिळते. दररोज शेकडो दुचाकी गाडया स्‍टँडच्‍या आवारात बेकायदा उभ्‍या असतात. महत्‍वाचे म्‍हणजे एसटी व्‍यवस्‍थापन किंवा सुरक्षा रक्षकांचे यावर कुठलेच नियंत्रण दिसत नाही.
जवळपास एकर भर जागेत असलेल्‍या अलिबाग स्‍थानकात भरपूर मोकळी जागा आहे. परंतु स्‍थानक उभारताना किंवा नव्‍याने उभारणी करताना जागेचे नियोजन अजिबात केल्‍याचे दिसत नाही. या जागेचा खूप चांगला उपयोग होवू शकतो परंतु एसटीच्‍या नियोजनशून्‍य कारभारामुळे जागेचा वापर होण्‍याऐवजी गैरवापरच अधिक होतो आहे.
आजचा अपघात ही केवळ झांकी आहे. अलिबाग बस्‍थानकात भवि ष्‍यात मोठा अपघात होण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. आजच्‍या अपघातात मनुष्‍यहानी झाली नाही किंवा कुणी जखमी झाले नाही हे सुदैव म्‍हणावं लागेल. परंतु या अपघातानंतर तरी एसटीच्‍या अधिकारयांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे.