अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील असंख्य गावे विस्थापीत करून नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती झालेली आहे. या विमानतळाखाली रायगड जिल्ह्यातील असंख्य भूमीपुत्रांची घरे व जमिनी गेलेल्या आहेत. या सर्व भूमीपुत्रांची रायगड आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी सदैव कार्यरत राहीलेल्या लोकनेते स्व .दि. बा. पाटील यांचे नांव या विमानतळाला देण्याचा आग्रह आहे.या आग्रही भूमिकेचे महत्व लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने विमानतळाला स्व.दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास सहकार्य करून आपला पाठिंबा दर्शवावा याबाबतचे निवेदन रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिले आहे.
स्व. दि.बा. पाटील यांच्या नावाकरीता असंख्य अंदोलने झालेली असून, स्थानिक भूमीपुत्र रस्त्यावर उतरलेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये या विमानतळाला लोकनेते माननीय दि. बा. पाटील यांचे नांव देण्यास सहमती दर्शविली होती. परंतू आता भा.ज.पा. प्रणित केंद्र सरकार व महायुती सरकारने या नावाला विरोध करून एन.एम.आय. ए.एल.असे नांव देण्याचा घाट घातलेला आहे. या अक्षरामागे वेगळा संकेत असून स्थानिक भूमीपुत्र लोकनेते स्व.दि. बा. पाटील यांच्याच नावासाठी आजदेखिल आग्रही आहेत. तसेच वेळ पडल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलनास तयार आहेत.
चालू संसदिय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीतर्फे निवडून आलेले खासदार सुरेश म्हात्रे यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे व पुन्हा लोकनेते स्व .दि. बा. पाटील यांच्या नावाची मागणी करून वेळ पडल्यास आंदोलनाचा इशारा देखिल दिलेला आहे.
लोकनेते स्व.दि. बा. पाटील यांच्या कार्याचा तसेच योगदानाचा विचार करता व स्थानिक भूमीपुत्रांच्या मागणीचा विचार करता प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपण काँग्रेस पक्षाकडून या विमानतळाला लोकनेते माननीय दि. बा. पाटील यांचे नांव देण्यास सहकार्य करून आपला पाठींबा दर्शवावा, तसेच चालू असलेल्या संसदिय अधिवेशामध्ये काँग्रेस पक्षाच्या खासदारांना व ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रस पक्षाच्या आमदारांना हा प्रश्न उपस्थित करण्याबाबत अवगत करून भा.ज.पा. प्रणित केंद्र सरकार व महायुती सरकारने NMIAL नाव देण्याचा घातलेला घाट उधळवून टाकण्यास व लोकनेते दि. बा. पाटील यांचे नांव देण्यास सहकार्य करावे, अशी विनंती राजाभाऊ ठाकूर यांनी आपल्या पत्र वजा निवेदनात केली आहे.
Home ताज्या बातम्या नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि . बा. पाटील यांचेच नाव द्यावे राजाभाऊ ठाकूर...









