म्हसोबा क्रीडा मंडळ, पेझारी आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा 2025 चे उद्घाटन पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील म्हसोबा क्रीडा मंडळ, पेझारी यांच्या वतीने आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा 2025 चे उद्घाटन अत्यंत उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन मा. सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत ग्रामीण भागात होत असलेल्या क्रीडा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाला गावातील मान्यवर, विविध क्रीडा संघांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर पहिला सामना रंगतदार ठरला असून खेळाडूंनी कौशल्यपूर्ण खेळ सादर केला. स्पर्धेत स्थानिक तसेच बाहेरील अनेक दमदार संघांनी सहभाग नोंदवला असून पुढील दोन दिवस ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

म्हसोबा क्रीडा मंडळाने उत्तम आयोजन करून ग्रामीण भागातील तरुणांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आहे. स्पर्धेचा विजेता संघ विशेष पारितोषिकाचा मानकरी ठरणार आहे.