नगराध्यक्षा नाईक यांनी घेतले पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक व माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी आज पद्मश्री आदरणीय तीर्थरूप डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीदरम्यान सामाजिक कार्य, अध्यात्मिक मूल्ये तसेच समाजातील सर्वांगीण विकासाबाबत सुसंवाद झाला. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना निःस्वार्थ सेवा, प्रामाणिकपणा व समाजहिताला प्राधान्य देण्याचा संदेश दिला.
नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी अलिबाग शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सामाजिक सलोखा याबाबत आपले अनुभव मांडले.
या प्रसंगी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अलिबाग शहराच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देत लोकसेवेची भावना जपण्याचे आवाहन केले. या भेटीमुळे सामाजिक व अध्यात्मिक विचारांना बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.