अलिबाग नगरपरिषदेतील शिवसेना (ठाकरे गट)चे नगरसेवक श्री. व सौ. पालकर यांनी घेतले जैन महाराजांचे आशीर्वाद


अलिबाग (प्रतिनिधी): आज, दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी अलिबाग शहरातील बाजारपेठ येथील श्री शांतिनाथ भगवान श्वेतांबर जैन मंदिरात भक्तिभावपूर्ण दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. या पावन प्रसंगी जैन धर्मगुरू परमपूज्य आचार्य भगवंत श्री वैराग्यरत्न सागर सुरिश्वर महाराज साहेबजी यांचे मंगल सान्निध्य लाभले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. संदीप पालकर व नगरसेविका सौ. श्वेता संदीप पालकर यांनी मंदिरात दर्शन घेऊन आचार्य श्रींचे शुभाशीर्वाद स्वीकारले. समाजसेवा, प्रामाणिक कारभार आणि जनहितासाठी निष्ठेने कार्य करण्याची प्रेरणा महाराज साहेबांकडून मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
धार्मिक श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या भेटीत अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमास जैन समाजातील मान्यवर, भक्तगण तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांत, भक्तिमय व सकारात्मक वातावरणात हा कार्यक्रम अत्यंत श्रद्धेने संपन्न झाला.