यशोधन पतसंस्थेकडून अलिबाग नगराध्यक्षा अक्षया नाईक यांना शुभेच्छा


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून अक्षया नाईक यांची निवड झाल्याबद्दल यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी यशोधन पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते.
अक्षया नाईक यांनी नगराध्यक्षा पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना, अलिबाग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्या भरीव कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शहरातील नागरी सुविधा, स्वच्छता, पायाभूत विकास, महिला व युवकांसाठी उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना अक्षया नाईक यांनी यशोधन पतसंस्थेचे आभार मानले. अलिबाग शहराच्या विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे सहकार क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सकारात्मक समन्वय अधोरेखित झाला.