स्व. काशिनाथ मरबा भगत (आप्पा) यांच्या ५व्या पुण्यस्मरणानिमित्त भक्तिरसाने न्हालेली भजन भावांजली


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग, वाडगाव येथे स्व. कारिनाथ मरबा भगत (आप्पा) यांच्या ५व्या पुण्यस्मरणानिमित्त भजन भावांजली या भक्तीमय संगीत भजन मैफलीचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता श्रद्धेच्या वातावरणात पार पडला.
या भजन मैफलीत प्रसिद्ध गायिका कु. स्नेहल सुनील पाटील (पारगाव–पनवेल) व सौ. तृप्ती अविनाश पाटील (तळोजे–पनवेल) यांनी आपल्या सुमधुर आणि भावपूर्ण आवाजात भक्तीगीतांची सुरेल मेजवानी सादर केली. त्यांना पखवाजावर विराज म्हात्रे (मानी–अलिबाग), तबल्यावर ॲड. सुरज गोंधळी खेरणे (पनवेल) तसेच टाळावर अरुण भगत (पनवेल) यांनी उत्कृष्ट साथ दिली. त्यांच्या सुरेल संगतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
कार्यक्रमाचे निवेदन श्री. नरेशदादा कडू आणि प्रा. जगदीश पाटील–लोणारकर यांनी प्रभावीपणे केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. प्रसाद पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पांचे चिरंजीव व वाडगावचे उपसरपंच जयेंद भगत व त्यांच्या पत्नी सरिता भगत यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भक्तीमय सोहळ्यास वाडगाव ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली श्रद्धा व्यक्त केली.