रोहा (प्रतिनिधी): रोहा तालुक्यातील घोसाळे जिल्हा परिषद या गटाच्या उमेदवारीसाठी इतर पक्षामध्ये चढाओढ सुरू असताना भारतीय जनता पक्षाकडून सौ. भावनाताई पंडितशेठ पाटील यांनी आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच माजी आमदार लोकनेते पंडित शेठ पाटील यांनी घोसाळे जिल्हा परिषदेच्या उमेदवारी साठी त्यांच्या पत्नी सौ. भावनाताई पंडितशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी संपूर्ण घोसाळे जिल्हा परिषदेच्या विभागात जोरदार गाव भेटी घेऊन मतदार पंडित शेठ सोबत आहेत हे दाखवून दिले होते.
त्यानंतर आज दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी पंडित शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सौ भावनाताई पंडितशेठ पाटील यांनी रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत रोहा तालुक्याचे निवडणूक अधिकारी श्री खुटवड यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाकडून घोसाळे जिल्हा परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत शेलार, बबलु सय्यद, माजी शहर अध्यक्ष यज्ञेश भांड, अल्प संख्यांक जिल्हा अध्यक्ष लिया खोत, अध्यक्ष महेश ठाकूर, जिल्हा उपाध्य नंदेश यादव, जितू जोशी, चणेरा विभाग अध्यक्ष अतुल पाटील, रोशन गांगल, वसंत पाटील, स्वप्नील सानप, प्रकाश धुमाळ, शिवाजी जाधव, मोतीराम म्हात्रे, परशुराम वाघमारे, मंगेश मोहिते इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.









