मुनवली येथे आवास जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद,


सोगाव(अब्दुल सोगावकर) :रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघे घेण्यापूर्वीच प्रचाराला ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आवास मतदार संघातील मुनवली येथे काँग्रेस व शेकाप महाविकास आघाडीचे रायगड जिल्हा परिषदेचे लोकप्रिय उमेदवार राजाभाऊ ठाकूर व अलिबाग पंचायत समितीच्या किहीम गणातील लोकप्रिय उमेदवार अनिता शिंदे यांच्या प्रचाराला रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी मुनवली हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रचाराला आलेले रायगड जिल्हा परिषदेचे उमेदवार राजाभाऊ ठाकूर व किहीम पंचायत समितीच्या गणातील उमेदवार अनिता शिंदे हे यांना सुनिल थळे व सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी दोन्ही उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देणार आहोत, असा ठाम विश्वास दिला. दरम्यान मुनवली ग्रामस्थांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा देत भरघोस मतदान करून विजयी करण्याचा शब्द दिला आहे. याप्रसंगी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश वडे, सातिर्जे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्राची ठाकूर, आवास जिल्हा परिषद मतदारसंघाचे शेकाप चिटणीस संदिप गायकवाड, किहीम उपसरपंच मिलिंद पडवळ, राजन भोईर, किरण ठाकूर, आकाश राणे, किहीम ग्रामपंचायत सदस्य संतोष किर, मापगाव ग्रामपंचायत माजी सदस्य चंद्रकांत खोत, संजय शिंदे, माजी सदस्या सानिका घाडी, विवेक जोशी, दिलीप मोंढे, सामाजिक कार्यकर्ते सतिश घाडी, सचिन घाडी, प्रविण घाडी, अक्षय जाधव, मनिष खाडे, जयेश ठकरूळ, प्रणित पुजारी, रुपेश अनमाने, सम्राट ठाकूर, निकेश अनमाने तसेच काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि मुनवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.