मतदान 7 फेब्रुवारीला तर मत मोजणी 9 फेब्रुवारीला
रायगड(प्रतिनिधी): राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात २८ ते ३० जानेवारी दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
मूळ कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया २७ जानेवारीला पूर्ण झाली होती. मात्र, दुखवट्याच्या काळात उमेदवारांना प्रचार करणे शक्य नसल्याने आयोगाने मतदानाचे उर्वरित टप्पे पुढे ढकलले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे.
असा असेल सुधारित कार्यक्रम:-
निवडणूक सूचना प्रसिद्ध करणे: ३१ जानेवारी २०२६.
मतदान: ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३०).
मतमोजणी: ९ फेब्रुवारी २०२६.
या निवडणुका रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर यांसह १२ जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता निकाल लागेपर्यंत लागू राहील, असे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.









