अलिबाग(प्रतिनिधी): शेतकरी कामगार पक्षाच्या कार्य प्रणालीवर खूश होऊन शिंदे गटातील कामार्ले ग्रामपंचायत सदस्य तुकाराम नाईक यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणघर येथे शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. तुकाराम नाईक या नवनिर्वाचित कार्यकर्त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी शेकापचे अलिबाग तालूका मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष परशुराम गजने, कामार्लेचे माजी सरपंच संदीप वाघपंजे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील उपतालुका प्रमुख कैलास गजने, ग्रामपंचायत सरपंच अजिता गजने, सदस्य प्रगती शिंगरुत, प्रगती पाटील, गिता नाईक, अनिता पाटील तसेच कामार्लेचे माजी तंटामुक्त अध्यक्ष दिपक गोंधळी, अशोक नागावकर, सुरज पाटील, सुपल पाटील, हेमंत पाटील, सतिश गावंड, आदेश वाघपंजे, नरेंद्र पाटील, उत्तम वगरे, सिताराम नाईक, सागर जाधव आदी शेकाप, शिवसेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते , महिला तरूण वर्ग उपस्थित होते.
शिंदे गटातील मनमानी कारभाराला कंटाळून ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य तुकाराम नाईक यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला . ऐन निवडणूकीत शिंदे नाईक यांनी शेकाप मध्ये प्रवेश केल्याने शिंदे गटाला फटका बसला. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते तुकाराम नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.









