रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना गटनेतेपदी मानसी दळवी यांची एकमुखी निवड


रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेतेपदी अलिबागच्या मानसी दळवी यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज अलिबाग येथील हॉटेल रविकिरण येथे पार पडली.
या बैठकीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या सदस्यांना पुढील कामकाजाबाबत सूचना देण्यात आल्या.
दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी गटनेतेपदासाठी मानसी दळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा देत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
आगामी काळात रायगड जिल्हा परिषद मध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला.