४ मार्च रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन


रायगड-अलिबाग (जिमाका) :- जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा होतो. परंतु माहे मार्च २०२६ मध्ये पहिला सोमवार, दि.०२ मार्च रोजी होळी सणानिमित्त स्थानिक सुट्टी जाहिर असून, दि.०३ मार्च २०२६ रोजी धुळीवंदन निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने माहे मार्च २०२६ चा लोकशाही दिन बुधवार दि.४ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १.०० वा.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला आहे असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके यांनी कळविले आहे.