रायगड पोलीस दलात मोठे फेरबदल


जिल्हा अधीक्षकांकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी
रायगड(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अलिबाग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने एकाच पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या (API) आणि पोलीस निरीक्षकांच्या (PI) तात्पुरत्या स्वरूपात बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत.
​पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, जनहितार्थ आणि प्रशासकीय निकडीपोटी या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या बदल्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सपोनि नितीन मोहन मोहिते प्रभारी अधिकारी, कोलाड येथून खोपोली पोलीस ठाणे येथे बदली.  
सपोनि हनुमंत दादा शिंदे प्रभारी अधिकारी, दिघी सागरी येथून अलिबाग पोलीस ठाणे येथे बदली.  
सपोनि विजय बंडू सुर्वे प्रभारी अधिकारी, गोरेगाव येथून माणगाव पोलीस ठाणे येथे बदली.  
सपोनि अनिल मोतीराम सोनोने प्रभारी अधिकारी, माथेरान येथून कर्जत पोलीस ठाणे येथे बदली. 
रिक्त झालेल्या जागी खालील अधिकाऱ्यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मसपोनि सरिता निळकंठ मुसळे अलिबाग येथून प्रभारी अधिकारी, माथेरान पोलीस ठाणे म्हणून नियुक्ती.  
सपोनि संतोष श्रीपाल आवटी खालापूर येथून प्रभारी अधिकारी, दिघी सागरी पोलीस ठाणे म्हणून नियुक्ती.  
सपोनि नरेंद्र लिंबाजी बेलदार माणगाव येथून प्रभारी अधिकारी, गोरेगाव पोलीस ठाणे म्हणून नियुक्ती.  
सपोनि भारत बाबुराव फार्णे अलिबाग येथून प्रभारी अधिकारी, कोलाड पोलीस ठाणे म्हणून नियुक्ती.  
पोनि अभिजीत अरविंद भुजबळ प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतूक शाखा येथून प्रभारी अधिकारी, रसायनी पोलीस ठाणे म्हणून नियुक्ती. 
मपोनि सरिता दत्ताराम चव्हाण प्रभारी अधिकारी, भरोसा सेल येथून प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतूक शाखा म्हणून नियुक्ती.  
मसपोनि स्मिता शशिकांत पाटील नियंत्रण कक्ष येथून प्रभारी अधिकारी, भरोसा सेल म्हणून नियुक्ती.  
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, कार्यमुक्त होताना प्रलंबित असलेले गुन्हे, अर्ज आणि प्रकरणांचा कार्यभार लेखी स्वरूपात दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामाला अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.