राजिपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन


अलिबाग(प्रतिनिधी): अलिबागमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुवारी (ता.19) अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या कुंटेबाग येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता विनायक तेलंग, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.